
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील उसेगांव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सहकार्याने दोन प्रेमियुगलांचा विवाह लावून देण्यात आला .
पुरस्कार प्राप्त उसेगांव तंटामुक्त समितीकडे प्रेमियुगलांनी विवाह बंधनात अडकण्यासाठी रितसर अर्ज केला होता. रतन गुलाब दडमल वय २५ वर्ष जात – माना यांचा अनेक वर्षापासुन सोनेगाव ( गावंडे) येथील शुभांगी श्रावण चौधरी वय २० वर्ष जात – माना हिच्याशी अनेक वर्षापासुन प्रेम संबंध होते .अनेक त्यांनी कसमे , वादे केले होते . “साथ जियेंगे साथ मरेंगे ” अशा फील्मी स्टाईलने त्यांचे प्रेम संबंध होते . घरच्यांच्या विरोधाला मुलगी न जुमानता मुलांसोबत लग्न करण्याचा चंग बांधला .दोघेही एकाच अनुसुचीत जमातीचे असल्यामुळे गांधी जयंती निमीत्य त्यांचा उसेगांव ग्रामपंचायतच्या आवारात कोरोनाचे नियम पाळित या दोन प्रेमीयुगलांचा त्यांचा हिंदु रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देण्यात आला .
यावेळी विवाह सोहळ्यास उसेगांव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिवराज नन्नावरे , पोलीस पाटिल हरेश बगडे , सरपंच प्रियंका पाटिल उसेगांव , उपसरपंच निखील चाफले , अशोक कामडी ग्रा.पं.सदस्य , कालिदास डांगे , ब्रम्हा सांदेकर , सुनिता कामडी , राजेंद्र रणदिवे , पञकार जितेन्द्र गाडगे , नंदकिशोर बगडे , संजय पिल्लेवान , शिगाल पाटील व अन्य तंटामुक्त समितीचे सदस्य व उसेगांव येथील महीला व पुरूष विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थितीत होते आणि