
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दुर्गापूर पोलीस स्टेशनला (मुख्याध्यापक) कमलाकर वारलुजी पाटील वय 56 वर्षे राहणार चंद्रपुर यांनी तोंडी रिपोर्ट दिली, दिलेल्या माहितीनुसार दि. ५/१०/२०२१ रोजी रात्रौ १६.०० वा. ते ०७/१०/२०२१ चे १०.०० वाजताच्या दरम्यान WCL colony शक्तीनगर येथील जि.प.शाळेतील दोन मॉनिटर अंदाजे किंमत 30,000/- रू. CPU 8000/- रू. एक LED मॉनिटर 20000/- एक विज्ञान पेटी 2000/- दोन माईक व अम्पिफायर 7000/- दोन वाजवायचे ड्रम 3000/- असा एकुण 70000/-रुपयाचा माल चोरीस गेला आहे, या रिपोर्ट वरून दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप क्र. २४५/२०२१ कलम ३८०,४५७,४५४ भा.द.वि. चा गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर गुन्हे शोध पथकातील पो.उप. नी. प्रविण सोनोने, पो.हवा. सुनिल गौरकार, पो. अं. मंगेश शेंडे पो. अं. मनोहर जाधव व किशोर वलके पो.स्टे. दुर्गापूर यांनी आरोपी नामे १) शाम सुरेश पवार वय २४ व पाहिजे आरोपी २) संदीप राजू धोत्रे सर्व रा. दुर्गापूर वार्ड क्र. ४ यांना अटक करून वरील नमुद चोरी गेलेला मुद्देमाल पेकी जप्त केलेला असा एकुण 43,000/- रू. चा माल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.