
नागपूर :- अपंग, अनाथ , विधवा अशा गरीब गरजु वंचितांसाठी मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशीय संस्था कार्य करत असतात, त्यामुळे आज दिनांक 7/10/2021च्या रोजी विनित ( चिकू ) लांडगे या दिव्यांग मुलाचा वाढदिवसानिमित्त नागपूर मधील झोपडपट्टी भागात तेथील राहत असलेल्या दिव्यांग व सर्व साधारण मुलांबरोबर वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना भोजन दान करण्यात आला.
त्यामुळे तेथील राहत असलेल्या मुलांना व पालकांना खूप आनंद झाला. उपस्थित मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशीय संस्थेचे संस्थापक सुनिल जनबंधु , संस्थेचे अध्यक्ष अनिल शेंदरे , दामोदर चकोले , सौ. सुजाता लांडगे व परिवार उपस्थित होते.