
नागपूर, दि. ११ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर -गडचिरोली जिल्हयाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. सोमवारी दुपारीच ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होणार आहेत.राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत . तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपआयुक्त बसवराज तेली, राजशिष्टाचार अधिकारी जगदीश कातकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.उदया मंगळवारी गडचिरोली येथील कार्यक्रम आटपून ते नागपूरला पोहचणार आहेत.उदया मंगळवारी दुपारी ३.३० ला ते विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.