
नहराची दुरुस्ती करा परीसरातील शेतकऱ्यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
शंकरपुर:-शंकरपूर येथून जवळच असलेल्या सिंचाई विभाग डोंगरगाव तलाव असल्यामुळे तलावालगत असलेले शेतकऱ्यांना तलावातील पाण्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो परंतु मागील अनेक वर्षापासून सिंचाई विभाग अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या तलावालगत चौदाशे हेक्टर शेती ओलीत असुन धान पिके इतर पिके शेतकरी घेत असतात परिसरातील शंकरपुर, हिरापूर,किटाडी, चक, चकजाटेपार, डोंगरगाव,डोमा या गावातील शेतकऱ्यांना तलावातील पाण्याचा पुरवठा सिंचाई विभागामार्फत करण्यात येतो मात्र पाणी जाण्यासाठी तलावाच्या मुख्य नहराची साफसफाई, व डागडुगी मागील अनेक वर्षापासून सिंचन विभागाने न केल्यामुळे डोंगरगाव तलाव मुख्य नहरामध्ये गवत, कचरा, मोठ्या प्रमाणात वाढलेला असून ठिकठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे.
त्यामुळे तलावाच्या पाण्यावर शेवटच्या टोकापर्यंत अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे, ज्या ठिकाणी गवत,कचरा आहे, त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले असल्यामुळे वेस्टेज पाण्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसताना सुद्धा त्यांच्या पिकांची नासाडी होत आहे, तसेच पाण्याची सुद्धा नासाडी होत आहे, नहराचे पाणी ज्या ठिकाणी जमा आहे तिथून पार फुटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नहराची पार फुटल्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकते,
उन्हाळ्यामध्ये डोंगरगाव तलावावर परिसरातील शेतकरी पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी नेत असतात तसेच या तलावाला लागूनच जंगल असल्यामुळे वन्य प्राणी वाघ, बिबट, रानगवा,निलगाय,हरिण चितळ,अस्वल, रानडुक्कर,मोर, ससा इतर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात मात्र आतापासूनच पाण्याचा दुरुपयोग झाल्यास उन्हाळ्यामध्ये पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांना समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे तलावाकडे व तलावाच्या मुख्य नहराकडे सिंचाई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.