
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-वैद्यकिय अधीकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन न करता आरोग्य सहाय्यीकेच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना लसीचे 2700 डोसेस खराब झाले असल्याचे नुकतेच भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडले आहे. कोरोना चे लस इतका मोठा साठा खराब होण्याचे राज्यातील पहिलीच घटना असावी असे वाटते. चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात शित साखळी केंद्रातील कोविड- १९ लसींचे डोस गोठल्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भिसीचे वैद्यकीय अधिकारी यांना नुकतेच पत्र देऊन याबाबद्द चा खुलासा मागितला आहे.भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्राला कवच कुंडल योजने अंतर्गत कोवीशील्ड चे १६०० डोजेस, कोव्हॅक्सीन चे १०० डोजेस, तसेच नियमीत लसीकरणासाठी आलेले कोवीशील्ड चे १००० डोजेस असे एकून २७०० डोजेस इतका लससाठा देण्यात आला होता. सदर लसींचा साठा हा शितसाखळी केंद्रातील Deep Freezer मध्ये ठेवल्यामुळे लसींचे एकूण २७०० डोस गोठल्यामुळे खराब झाले आहेत. लसीचे व्यवस्थापन करण्याची तसेच शित साखळी हाताळणाची जबाबदारी आरोग्य सहाय्यीका श्रीमती शिला कराळे यांची होती परंतू त्यांच्या बेजबाबदारपणामुळे सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वैद्यकीय अधीकारी म्हणून डॉ. प्रियंका कष्टी यांना सुध्दा कारने दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. नोटीस मध्ये सदर लसींची किंमत शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे वसूल का करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा २४ तासांचे आत या कार्यालयास सादर करण्यात यावा. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
याबाबद भिसी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी यांना विचारना केली असता त्यांनी सांगीतले की लस साठा हाताळण्याची जवाबदारी आरोग्य सहाय्यीका शिला कराळे यांची होती. प्राप्त झालेला लससाठा कराळे यांनी Deep Freezer ठेवला व दुसऱ्या दिवशी कोणतीही पूर्व सुचना न देता सुटीवर गेल्या. दुसऱ्या दिवशी लस नेहमीच्या ठिकानी न मीळाल्याने मि त्यांना फोनवरून विचारना केली असता लस Deep Freezer मध्ये ठेवल्याचे कराळे यांनी सांगीतले. त्याच दिवशी मि कराळे यांच्या नावाने कारने दाखवा नोटिस जारी केला व सदर घटनेची माहीती मि स्वतः वरीष्ठ अधीकाऱ्यांना दिली. जिल्हा आरोग्य अधीकाऱ्यांनी मला व कराळे यांना कारने दाखवा नोटीस दिला असुन कराळे यांनी ” माझ्या चुकीमुळेच २७०० डोजेस खराब झाल्याचे मान्य केले आहे.” व तसे लेखी स्पष्टीकरण जिल्हा आरोग्य अधीकाऱ्यांना देण्यात आले आहे.
भिसी PHC चे 70 टक्के लसीकरण पूर्ण
भिसी प्राथमीक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधीकारी डॉ. प्रियंका कष्टी यांनी सांगीतले की भिसी PHC तसेच या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण उपकेंत आतापर्यत 70 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण झालेले आहे. उरलेल्या 3O टक्क्यांमध्ये मजूरीला जाणारे, लस घेण्यास उत्सूक नसलेले तसेच बाहेर गावी गेलेल्यांची संख्या जास्त आहे.आरोग्य केंद्रांत लस चा मुबलक साठा असूनही जनतेकडून योग्य प्रतीसाद मिळाल्यास भिसी PHC अंतर्गत शंभर टक्के लसीकरणाचा उद्येश पूर्ण करता येईल. तसेच यापूढेही लसीकरण नियमीत सुरू राहणार असून जास्तीत जास्त संख्येत नागरीकांनी उपस्थित राहुन लसीकरण करून घेण्याचे आव्हान डॉ. प्रियंका कष्टी यांनी केले आहे.