
प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके , अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे व वंचित बहुजन आघाडी , दवलामेटी शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते वामन वाहने, ईश्वर राऊत, छत्रपती शेंद्रे, रोहित राऊत, रवी पाखरे, मधुकर गजभिये, जयकुमार नाईक, सोनू बोरकर, अनवर अली, रईस डोंगरे, कोर भाऊ यांनी परिसरात ठीक ठिकाणी जाऊन अशोक विजया दशमीचा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला.आठवा मैल येथील मंडपे ले आऊट प्रज्ञा शील करुणा बुद्ध विहारात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त पंचशील ध्वजा रोहन भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुरेश उके यांच्या हस्ते करण्यात आले.
तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिक्षण तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुभाष खाकसे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. बुद्धीविहारात तथागत बुद्ध प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मेणबत्ती जेष्ठ नागरिक रामुजी गडपाल व भारतीय बौद्ध महासभा नागपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी सुरेश उके यांनी बावीस प्रतिज्ञाचे वाचन करून धम्म दीक्षा प्रदान केली. या प्रसंगी सुरेश उके यांनी बुद्ध धम्माचा प्रसाराची गरज व महत्व व्यक्त केले.
प्रा.सुभाष खाकसे यांनी ही बदलता काळानुसार समस्या बदलत आहे. तेंव्हा विद्यार्थी व महिला याना मार्गदर्शनाची, संघटनेची नितांत गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रणजित राऊत यांनी केले.या प्रसंगी शीला रंगारी, राजेश रंगारी, किरण राऊत, प्रीती वाकडे, मीना गजभिये,सिद्धार्थ पाटील सह उपासक उपासीका उपस्थित होते.