
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी येथील प्रभाग क्र ४ मधील दिपंकर बुद्ध विहाराचे प्रांगणात १४ आक्टोंबर ला ६६ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून पुष्पांजली वाहण्यात आली
यावेळी पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले
यानंतर वार्ड मेंबर सौ.पद्मश्री संजय नागदेवते यांनी प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याचा गौरव करणारे सुमधुर आवाजात गौरवगित सादर केले, याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भानुदास पोपटे गुरुजी हे होते,यावेळी धम्म चक्र प्रवर्तन दिनाने कोणाला काय दिले ? यावर आपले विचार मांडताना भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीचा संदर्भ देतांना पोपटे गुरुजी म्हणाले की तो एप्रिल महीना म्हणजे उन्हाळा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशातील थंड भागात बराच काळ राहील्या मुळे त्या वातावरणाची सवय झाली होती हे लक्षात घेऊन तत्कालीन पक्षाचे नाव न घेता क्रुष्न कारस्थानी कार्यकर्ते यांनी सर्व शासकीय विश्राम ग्रुह हे विनाकारण स्वतः च्या नावावर बुक करून ठेवली होती त्यांना हे माहीत होते की वडसा व देसाई गंज परिसरातील कोणत्या च महार कार्य कर्त्यांचे संडास बाथरूम असलेले घर उपलब्ध नव्हते त्यामुळे डॉ आंबेडकरांची गैरसोय व्हावी हा त्यांचा दुष्ट द्रुष्टीकोण होता
त्या काळात सर्व सोयी असणारे भंडाऱ्यात हाँटेल्स नव्हते त्यामुळे प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रात्रीचा मुक्काम मा.कोलते नावाचे ओबीसी सदग्रुहस्थांचे फार्म हाउसवर व्यवस्था करण्यात आली होती आता तेथे अशोक ले लँड कंपनिचे प्रतिक्षालय आहे.
दुसऱ्या दिवशी तत्कालीन चांदा जिल्ह्यातील देसाई गंज वडसा येथे त्यांची सायं ७ वाजता जाहीर सभा होती परंतु बाबासाहेब आंबेडकर दुपारी दोन वाजताच पोहोचले होते त्यामुळे चार पाच तास डॉ बाबासाहेबांची विश्रांती करण्याची कोठे व्यवस्था करावी याबाबत कार्यकर्त्यांत मोठी धावपड सुरू झाली होती शे.काँ फे.चांदा जिल्हा अध्यक्ष जनार्दन गोविंद संत गुरुजी हे होते त्यामुळे तेही घामाघूम होत होते.ही वार्ता कर्नोपकर्णी माजी मालगुजार श्रीराम जाँनी यांचे कानावर गेली होती.भलेही ते सवर्ण हिंदू होते. परंतु त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की आपण माझ्या घरी तुमच्या कार्यकर्त्यासह मुक्कामास यावे आणी डॉ बाबासाहेबांना नाईलाजाने त्यांचे घरी मुक्काम करावा लागला होता हा त्यावेळचा महार जातीचा असाही एक काळ होता.
आज दरम्यान ६५ वर्षानंतर श्रीराम जाँनी यांच्या घरासारखे देसाई गंज मध्ये हजारो घरे आहेत तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाने महार या जातीला भिकार आणि अत्यंत हवालदिल जिवन जगण्यापासुन आजचे सन्मानाचे जीवन प्रदान केलेले आहे.ज्यांनी बुध्दि निष्ठ, तर्कनिष्ठ,विज्ञान निष्ठ,आणी कल्याणकारी बौद्ध विचार स्विकारला ते पुढे गेले असे विचार भानुदास पोपटे गुरुजी यांनी व्यक्त केले याप्रसंगी ज्योत्स्ना गोंडाने मँडम,अजिंक्य पोपटे, ममता घोनमोडे, सोनल पोपटे आदिंनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे विषयी मोलाचे मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागनाथ फुलझेले होते प्रास्ताविक प्रतिक मेश्राम यांनी केले संचालन अमित पाटील यांनी व आभार सचिन नगराळे यांनी मानले सर्व उपस्थीतांकरिता अनिल नगराळे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती तर मुलांकरिता वजेश्वरी अजिंक्य पोपटे यांनी सोनपापडी व चाकलेटची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विक्की पोपटे ,अमोल पोपटे,अमर नगराळे,महेश नगराळे ,आकाश पोपटे, गिताबाई जगताप, सरिता पोपटे,गौतमी पोपटे आणी मिलिंद युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते रमाई महीला मंडळीच्या सर्व महीलांना अथक परिश्रम घेतले.