
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र )
दवलामेटी :- भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व सोनोली ग्रामपंचायत सदस्य शेखर गोंडाने यांनी, जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे तसेच दवलामेटी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर बकाराम गजभिये यांचा नेतृत्वात कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत मध्ये जाहीर प्रवेश केला. दवलामेटी येथील पदाधिकारी वामन जी वाहने यांचा नेतृत्त्वात सामजिक कार्यकर्ते गौतम खोब्रागडे यांनी आपल्याला कार्यकर्त्यांन सह पक्ष प्रवेश केला.भारतीय जनता पक्षात गेल्या 15ते 20 वर्ष काम करूनही अनुसुचित जातीच्या कार्यकर्त्यांना कुठलाही मानसन्मान मिळत नाही समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळत नाही.
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाव मिळत नाही या सर्व प्रकाराला कंटाळून भारतीय जनता पक्षाचे अनुसुचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व सोनोली ग्रामपंचायत चे सदस्य शेखर गोंडाने यांनी प्रभावशाली व असरदार व्यक्तिमत्व कार्यकर्त्यावर जीवापार प्रेम करणारे प्रकाशजी आंबेडकर व अन्जलिताई आंबेडकर यांच्या प्रमूख उपस्थितीत व ज्येष्ठ नेते राजुभाऊ लोखंडे, कुशलजी मेश्राम, राहुलजी वानखेडे व प्रसिद्ध आंबेडकरी प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर, वीवेकजी हाडके, जिल्हा अध्यक्ष वीलासजी वाटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपुर येथील रवीभवन येथे पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत वंचित बहुजन आघाडीत अधिक्रुत प्रवेश केला.
शेखर गोंडाने यांच्यासह पितांबर गायकवाड प्रदिप गायकवाड.प्रमोद सोमकुवर सिद्धार्थ रक्षित राजु गायकवाड रोशन गजभिये रमेश गायकवाड कीसनाजी पाटील अमित सहारे सागर वाघमारे प्रशांत रक्षित विशाल रक्षित मनोहर गजभिये.यांनीही प्रवेश घेतला
यावेळेस दिगांबर डोंगरे यांनी पक्षाचा दुपट्टा व टाकुन सर्वांचे स्वागत केले व पक्षाची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी सर्वानी प्रयत्नांची पराकाष्ठा करून वंचित समूहाला सोबत घेवुन बाळासाहेबांची विचार गावागावात पोहचवीन्याचे काम करावे असे सांगितले.