
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्गावरील आठवा मैल पासून ३ किलोमीटर अंतरावर स्थित दृग्धामना ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवारी दुपारी एका १२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू ने क्षेत्रात खळबळी व शोक निर्माण झाल्याचे दिसून आले.ग्रा.पं.दृगधामना चे उपसरपंच बंडू गजभिये यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,मृतक बालकाचे नाव सुरज नाशिक रामटेके असून तो वार्ड क्रमांक १ विवेकानंद नगर दृगधामना येथे आपल्या आई-वडिलांसह राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी आई वडील नेहमी प्रमाणे मजुरीसाठी कामावर निघून गेले,घरी तो आपली मोठ्या बहीणी सोबत होता.दुपारी ३ च्या दरम्यान काही सामग्री व खाद्य वस्तू खरेदी करण्याचे कारण सांगून परिसरातील एका किराणा दुकानात पोहोचला.
परंतु काही वेळानंतर जोरा-जोरात श्वास घेत घरी पोहोचला.त्याने बहिणीला घाबरून व शरीरावरच्या जखमा दाखवून सांगितले की,त्याला कुणीतरी मारलेले आहे व त्याने पिण्यासाठी पाणी मागितले.पाणी पिल्यानंतर तो बेशुद्ध होऊन खाली पडला.बहिण घाबरून गेली तिने परिचितांना बोलाविले व काही वेळा पश्चात आई-वडील ही घरी पोहोचले त्याची ही परिस्थिती पाहून ते ही घाबरून गेले व पळत ग्रामपंचायत ला पोहोचले. माहिती देऊन सहकार्याचा अनुरोध केला.ग्रामपंचायत मधून ते घरी पोहोचले तेव्हा सुरज ची कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून आले नाही.
त्याच्या डोळ्याजवळ सुज दिसून गळ्याला दोरीचे ओढलेले डाग दिसून आले. त्यांला तातडीने उपचार हेतु घेऊन गेले परंतु रस्त्यातच त्यानी अखेरचा श्वास घेतला.वाडी पोलिसांना सूचना मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवाला नागपुरात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे रामटेके परिवारातील कुळाचा दिवा विझल्याने मोठे दुःख निर्माण झाले. या घटनेची तातडीने तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.