
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
वाडी(प्र): दृगधामना गावात आज सोमवारला 12 वर्षीय बालकाच्या हत्या प्रकरणामुळे पूर्ण गाव शोकमग्न वातावरणात होते.सायंकाळी 5 वा. शोकाकुल वातावरणात बालकाचा अंत्यसंस्कार संपन्न झाला. मृतक बालकाचे आई वडील अजूनही दुःखातून सावरले नाहीत.मात्र अंत्यसंस्कार वेळी मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
प्रत्यक्ष घटना स्थळाचे निरीक्षण केले असता दोन्ही परिवार राचे घर अमोरा समोर आहे,उपस्थित काही नागरिकांनी सांगितले की गावासाठी ही घटना म्हणजे दुर्भाग्यपूर्ण आहे, कारण यामुळे दोन्ही कुटुंबाचे नुकसान झाले आहे, दोन्ही परिवारातील कुटुंब प्रमुख सकाळी कामावर निघून जातात सायंकाळी परत येतात त्यामुळे मुले काय करतात त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अश्या अनपेक्षित घटना घडतात.
गावच्या सरपंच साधना कराळे व उपसरपंच बंडू गजभिये यांनी भावना,भीती व क्रोध ही घटना घडल्याचे मत व्यक्त केले.दोन्ही परिवारात व गावात शांतीचे वातावरण ठेवण्याचे प्रयत्न केले जात असून नागरिकांनी घडलेल्या घटनेपासून बोध घेऊन प्रत्येकांनी आपल्या मुलांकडे जातीने लक्ष देने। अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
तपास अधिकारी साजिद अहमद यांनी दिलेल्या माहिनुसार आरोपी स्नेहल सोनपिंपळे याला न्यायालयात प्रस्तुत केले असता 25 ऑक्टोम्बर पर्यंत पोलीस कोठडी सूनवल्याची माहिती दिली.