
नागपूर :- नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नागपूर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर पलटी मारली आणि पेट घेतल्याची घटना आज नऊ वाजताच्या सुमारास घडलेली आहे.
महामार्गाच्या अगदी मधोमध ट्रक पलटी होऊन पेट घेतल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.
दरम्यान घटनेचे माहिती मिळताच चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून पेटघेतलेला ट्रक विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.