Breaking News

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदारांचे एक हाती वर्चस्व

१८ पैकी १८ जागेवर 👊

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर( कळमना मार्केट) च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनल ने इतिहास घडवत सर्व १८ ही जागेवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला आहे.
सुनील केदार यांच्या सहकार पॅनल चे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विजय चौधरी, वसंतराव लांडगे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, बेनिराम राऊत, अहमदभाई शेख, बाबाराव शिंदे, रवीचंद्राबाई नांदूरकर, अंजली शिंदे, हरिभाऊ गाडबैल, अशोक सोनवाने तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे, दीपक राऊत, महेश चोखंद्रे, नारायण कापसे तसेच व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवाणी,अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर यांनी घवघवीत विजय मिळविला आहे.


आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, बाजार समितीचा हा विजय सहकार क्षेत्राचा विजय आहे. व सहकार विरोधी यांना शिकवलेला धडा आहे.१९७४ ला सहकार महर्षी श्रद्धेय बाबासाहेब केदार यांचा पुढाकाराने स्थापित बाजार समितीमधे सामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्याकरिता अविरत मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आतातरी केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याबाबत विचार करावा. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद असो वा बाजार समितीच्या झालेल्या निवडणुका असो या निकालाने भाजपाचा खरा चेहरा जनते समोर आला आहे.

येत्या काळात सुद्धा समस्त जनता भाजपाला त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नसल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजया नंतर शेतकरी,कष्टकरी वर्गाला योग्य न्याय देण्यात येणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यावेळी प्रमुख रूपाने माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, माजी जीप अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जीप उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जीप सदस्या भरती पाटील, ममता धोपटे, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, वृंदा नागपुरे,प्रकाश खापरे, दिनेश ढोले हिंगणा पंचायत समिती सभापती रेखा वरठी, उपसभापती संजय चिकटे, पंस सदस्य उज्वला खडसे, प्रीती अखंड, रुपाली मनोहर, अपर्णा राऊत उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे, नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक …

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved