
नागपूर :- एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे,पोलीसांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एम.आय.डी.सी.परीसरात वास्तव्याला असलेल्या १७ वर्षीय पिडीत मुलीसोबत त्याच वस्तीत राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने मित्रता केली,दोघही कमी वेळात छान मैत्री झाली दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या.
याच मैत्रीचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून बऱ्याच दिवसांपासून तिच्यावर अत्याचार करत होता, परंतु अल्पवयीन मुलीने लग्नाबद्दल विचारले की युवक टाळाटाळ करीत होता.त्यामुळे तिने लग्नाकरीता युवकांवर दबाव टाकला असता युवक लग्नास नकार देत मारहाण करीत होता.याबाबतची आहे तक्रार अल्पवयीन मुलीने पोलिसांमध्ये केली मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवका विरुद्ध गुन्हा दाखल करून भांदवि कलम ३७६ नुसार युवकांला अटक केली.