
खासदार रामदास तड़स यांचे उपस्थित कार्यक्रम सम्पन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर विभाग महिला आघाडी व जिल्ह्या नियुक्तया मा, खासदार तथा राज्य अध्यक्ष रामदास तड़स साहेब, राज्य महासचिव डॉ, भूषण कार्डिले कोषाध्यक्ष गजुनाना शेलार, यांचे आदेशानुसार राज्य सहसचिव बळवंतराव मोरघडे यानी केलेल्या सूचनेनुसार, चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यांचे शिफारसीनुसार दिनांक 23/10/2021 रोजी संताजी सभागृह नागपुर येथे राज्य अध्यक्ष रामदास तड़स यांचे उपस्थित विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे यानी चंद्रपुर विभागातील महिला आघाडी नियुक्तया जाहिर करून नियुक्ति पत्र वाटप केले,
चंद्रपुर विभाग कार्याध्यक्षापदी योगिता पिपरे, उपाध्यक्षपदी छबु वैरागड़े, चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्षापदी श्रुति घाटे, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षापदी भावना बावनकर, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षापदी अनिता मोगरे, गडचिरोली उत्तर जिल्हाध्यक्षापदी शिला सोमनकर, गडचिरोली दक्षिण जिल्हाध्यक्षापदी वर्षा ठाकरे, जिल्ह्या सचिव पदी ममता डुकरे, कार्याध्यक्षापदी पुष्पा हरने, उपाध्यक्षपदी यामिनी कामडी, यांची नियुक्ति करण्यात आली,
यावेळी, चंद्रपुर विभागीय सचिव संजय खाटीक, महिला आघाडी विभागीय अध्यक्षा कीर्ति कातोरे, सचिव मंगला डांगरे, युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, नागपुर विभागीय अध्यक्षा नयना झाड़े उपस्थित होते,