प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- पत्नीवर असलेल्या संशयावरुन एका पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, नागपुरमधील पाचपावली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये ही घटना घडली असून पीडित महिला ३५ टक्के भाजल्या गेली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे, सतीश भिमटे असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन सतीशने हे कृत्य केल्याचे कळते.
सतीश हा पेंटींगचे काम करतो त्याच्या घरी पत्नी भावना व दोन मुले असून गेल्या चार महिन्यांपासून सतीश हा बेरोजगार आहे, काम नसल्याकारणाने तो घरीच असल्याने चिडचिड करायचा. गेल्या काही दिवसांपासून सतीश आणि भावनामध्ये मोबाइलवर बोलण्यावरुन वाद होत होते. भावना आपल्या मित्राबरोबर मोबाईलवर बोलत राहायची हे सतीशला सहन होत नव्हते. तो तिच्यावर संशय घेऊ लागला व यातून त्यांची भाडण होऊ लागली. गेल्या काही दिवसांपासून सतीश रागातच होता. याच रागाच्या भरात पत्नी पहाटे पाच वाजता झोपली असताना सतीशने तेल गरम केले आणि ते उकळलेले तेल तिच्या चेहऱ्यावर फेकले.
अचानक झालेल्या या प्रकाराने भावना भांभावून उठली व जोरजोरात ओरडू लागली. या घटनेत भावनाचा चेहरा गंभीररित्या भाजला गेला, तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेची माहिती पाचपावली पोलीसांना मिळताच पोलिसांनी आरोपी सतीश विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.