Breaking News

मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 25 ऑक्टोंबर : मतदार नोंदणीसाठी 13,14 व 26, 27 नोव्हेंबर रोजी विशेष् मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाही अश्या नागरीकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव -नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. इ 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहील . तर 13 व 14 तसेच 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमा राबविण्यात येतील.20 डिसेंबरपर्यत दावे व हरकती निकालात काढता येतील.तर 5 जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसीध्दी करण्यात येईल. विशेष मोहिमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

शेवगाव शहराच्या रखडलेल्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या विविध अडचणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी बोलविली अधिकारी आणि नियुक्त कंपनीचे संयुक्त बैठक धरले धारेवर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- दिनांक ०५/ १२/ २०२३ वार मंगळवार रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved