Breaking News

गटविकास अधिकारी प.स.चिमूर यांना महाराष्ट्रराज्य ग्राम पंचायत युनियनच्या वतीने दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत युनियन तालुका चिमूर र.न.४५११ च्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये युनियनच्या वतीने गटविकास अधिकारी यांना सुचविण्यात आले की, संपुर्ण चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायत चे सचिव व सरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचे शासन अनुदान व्यतिरीक्त पगाराच्या ५० टक्के रक्कम व रहिवाशी भत्ता,भविष्य निधीची रक्कम मागील काही महिन्यापासुन प्रलंबित असुन दिवाळी सना पुर्वी सदर वेतन व इतर कामाच्या रक्मा देण्यात याव्या या विषयाची विनंती वजा इशारा दिलेला आहे. रक्मा न मिळाल्यास दिनांक १ / ११ / २०२१ पासुन पंचायत समिती प्रांगणात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे .

तसेच दिवाळी सना पुर्वी सदर मागण्या पुर्ण न झाल्यास मा.गटविकास अधिकारी व सर्व सचिव तथा सरपंच यांचे घरी दिवे लावून दिवाळी साजरी केली जाईल अशा प्रकारचे निवेदन सादर केले आहे .
सदर निवेदन देतांना ग्राम पंचायत कर्मचारी तालुका युनियन चिमूर चे अध्यक्ष गोपाल गावतुरे व सचिव किशोर कामडी उपस्थित होते .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved