
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा :- महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा व्दारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे प्राचार्य यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. रंजना लाड. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छ भारत अभियान सुरू आहेत. यासंदर्भात माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व ई-कचरा संकलन चे समन्वयक डॉ.प्रशांत वाघ यांनी दिवसेंदिवस वाढणाऱ्या इ- कचऱ्याचे प्रमाण, त्याची विल्हेवाट कशी लावावी, आपल्या महाविद्यालयात ई-कचरा संकलन का सुरू करण्यात आले. ई कचऱ्याच्या समस्येवरील उपाययोजना म्हणजे रिड्युज, रियुज आणि रिसायकल या त्रिसुत्रीचा वापर करून ई- कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवु शकतो. पण त्यासाठी हा ई – कचरा एकत्रितपणे गोळा करणे गरजेचे आहे. याकरिता आपल्या महाविद्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले.
या ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुरीटेक प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी यांनी ही जबाबदारी उचललेली आहे. या सामाजिक कार्यात विशेष करून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी सहभागी व्हावे.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील. यांनी समाजातील प्रत्येक क्रियेचे भान ठेवून ३६५ दिवस आपली जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडली पाहिजे असे विचार स्वयंसेवकांन प्रतिपादन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड. यांनी देखील कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवून नाविन्यपूर्ण स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेची शिस्तबद्ध अंमलबजावणीची परिपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता कापसे. आभार प्रदर्शन कु. अस्मिता लाभणे. यांनी केले तसेच कार्यक्रमाला स्वयंसेवकांचे भव्य उपस्थिती होती. व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.