Breaking News

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यातून, 1 कोरोनामुक्त – ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 22

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 27 ऑक्टोबर : जिल्ह्यात बुधवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 246 झाली आहे. सध्या 22 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 30 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 40 हजार 206 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved