Breaking News

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना वर्तणूक विषयक सूचना व निर्देशाचे यथोचितरित्या काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 140 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन, पप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 23 नोव्हेंबर रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 25 नोव्हेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर, 26 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर तर 30 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved