Breaking News

वनातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे समन्वयाने पूर्ण करावीत – दत्तात्रय भरणे

नागपूर, दि.29 : वनातून जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती कामे 1980 च्या पुराव्यानुसार करता येतात. मात्र, रस्ते निर्मितीसह वने व वन्यजीवांचा अधिवासही मानवासाठी तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे वनातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने समन्वयाने पूर्ण करावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिले.

रविभवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी नागपूर, अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागपूरचे मुख्य अभियंता संजय दशपुते, अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीष जोशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, सहायक प्रधान मुख्य वनसंरक्षक (नोडल) नरेश झुरमुरे यांच्यासह नागपूर व अमरावती विभागाचे वनाधिकारी, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

प्रादेशिक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रस्तेनिर्मिती व रस्ते दुरुस्ती 1980 च्या पुराव्यानिशी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन करावी. तसेच वन्यजीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती वन्यजीव संचार व जैवविविधतेचा धोका न पोहोचविता करावी. या घटकांवर परिणाम न होता तेथील अस्तित्वात असलेल्या रस्ते दुरुस्तीसाठी परवानगी संबंधित विभागाकडून दिली जाते. रस्त्याची सद्यस्थिती तसेच वनक्षेत्र दाखविण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करुन तशी चित्रफीत रस्ता दुरुस्तीच्या प्रस्तावासह सादर करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने वनांतून जाणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधून मंजुरीसाठी प्रयत्न करावेत, असे श्री. भरणे म्हणाले.

गडचिरोली जिल्हा 76 टक्के वनाच्छादीत आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या वनक्षेत्रातून जाणाऱ्या एकूण 21 रस्त्यांसाठी केंद्र सरकारने सुमारे 550 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तेथील वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या अधिवासाला त्रास न होता, या निधीतून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी प्रयत्न करावे. 17 प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्प मंजुरीसाठी पात्र आहेत. उर्वरित प्रकल्पांतील त्रुटींची पूर्तता करुन प्रकल्पांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे वनविभागाला सादर करुन तो पूर्ण करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

नागपूर अमरावती विभागातील नाबार्ड अंतर्गत पुल, इमारत, रस्ते निर्मिती प्रकल्प, केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत येणारी बांधकामे, हायब्रिड ॲन्यूटी अंतर्गत रस्ते बांधकाम, नगरोत्थान उपक्रमातून बांधकामे, अर्थसंकल्पीय तरतूद, एसआर प्रमाण, रेल्वे सुरक्षा संबंधीची कामे, वनपरिक्षेत्रातून जाणारी रस्ते दुरुस्तीची कामे आदी विषयांचा श्री. भरणे यांनी आढावा घेतला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर येथे नॅशनल लेव्हल कुंग फु – कराटे चॅम्पियनशीप झाले संपन्न

विविध राज्यांतील २९ टीम उतरल्या रिंगणात घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  …

तालुका काँग्रेस कार्यालय येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन कार्यक्रम करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी मंगलवार ला तालुका काँग्रेस कार्यलय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved