Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य अन्यथा रुपये 500/- चा दंड

        जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,चंद्रपूर यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 20121च्या आदेशाव्दारे खालील निर्देश निर्गमित केलेले आहेत.

1 ) चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याच्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील .
2 ) चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे . ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे , जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल .
3 ) सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे , यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख आस्थापना अधिकारी किंवा एका अधिका – यास नामनिर्देशित करतील .
4 ) सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणा – या अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी यांना संबंधित अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात / आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी ) रु .500 / – दंड आकारण्यास सक्षम प्राधिकारी राहील .
5 ) सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणा – या अभ्यागत / कर्मचारी / अधिका – यांना रु .500 / – दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल . सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिका – याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम शासन जमा करेल .

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनी लसीकरणाचे दोन्ही मात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत घेणे गरजेचे आहे . तथापि ज्यांनी पहिली मात्रा घेतलेली आहे त्यांनी पहिली मात्रा घेतल्याच्या 84 दिवसाच्या कालावधी नंतर दुसरी मात्रा घेणे गरजेचे आहे. अधिकारी/कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे . उक्त कालावधी झालेनंतर तपासणी दरम्यान लसीकरण घेतल्याचे आढळून न आल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती उक्त 1/3/1 व्यवस्थापन कायदा , 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता , 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा , 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कार्यवाही संबंधीत पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच इतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी करावी . या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त , महानगरपालिका , नगरपालिका / नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच ‘ जिल्ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुख यांची राहिल . या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ( Incident Commander ) उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल. सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दिनांक 29.10.2021 पासुन पुढील आदेशापावेतो लागू राहील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved