
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या नवीन कल्पतेतून दिवाळीसणाच्या पर्वावर चिमूर येथील पानठेला दुकानदाराना शुभेच्छा देत फराळ बॉक्स भेट दिले.चिमूर येथील वाड्यावर गेट टू गेदर कार्यक्रम मध्ये भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, माजी सभापती प्रकाश वाकडे, प्रमोद बारापात्रे ,जयंत गौरकर उपस्थित होते.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चिमूर चा विकास आणि काही अडथळे यावर सांगत आपल्या सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक असल्याचे सांगून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी पान ठरेल युनियन मनोज निखाते, पांडुरंग नवले, सातपुते आदी उपस्थित होते.