
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथील विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त भौगोलिक रानभेट कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना जंगलातील वनसंपदा, झाडे, पशुपक्षी, निसर्ग आधी माहिती देण्यास्तव भेट ठरविण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांच्या उपक्रमात आदेशान्वये वनराई बंधारा बांधून प्राणी, पक्षी यांना एक प्रकारची मदत करीत, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचे महत्व, जलस्तोत्र आदी ज्ञानात्मक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
बंधारा बांधण्यास्तव गावापासून दूर जंगलातील क्षेत्र निवडण्यात आले. यात प्रामुख्याने मंगलभाऊ बुराडे ग्रा.पं.उपसरपंच, सतिश गायकवाड ग्रा.पं. सदस्य, प्रदीप मोटघरे केंद्रप्रमुख, श्रीधर मेश्राम मुख्याध्यापक, नरेंद्र वासनिक स. शि, संजय येरणे स. शि. साहित्यिक यांनी विद्यार्थ्यांसह श्रमदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना या भौगोलिक भेटीने अनौपचारिक शैक्षणिक माहिती संजय येरणे यांनी करून दिली.
तालुक्यातील पहिला वनराई बंधारा व भौगोलिक क्षेत्रभेट, ज्ञानात्मक सहल असा आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांनी अभिनंदन केले आहे.