
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-युवा सेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन मंत्री मा, आदित्यसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार, युवासेना सचिव मा, वरुनजी सरदेसाई साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रव्यापी सायकल रयालीचे आयोजन सम्पूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले होते, या अनुषंगाने युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम, शितलताई देऊरुखकर, युवासेना जिल्ह्या विस्तारक त्रिपाठी यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्ह्या प्रमुख नितिनभाऊ मत्ते, युवासेना जिल्ह्याप्रमुख हर्षलभाऊ शिन्दे यांचे मार्गदर्शनात चिमूर तालुका युवासेनाच्या वतिने सायकल रैली काढण्यात आली,
केंद्र सरकार ने केलेल्या पेट्रोल डिझल दरवाढ़ीमुळे सर्वसामान्य जनतेचे हॉल होत आहेत, वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कम्बरड़े मोडणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे हॉल करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ चिमूर तालुका युवासेनेच्या वतीने सायकल रैली काढून केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन केंद्र सरकारने 2014 साली सरकार स्थापन करताना अब हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार या घोषवाक्यची आठवण करून केंद्र सरकारचा निषेद्य करण्यात आला,
यावेळी शिवसेनाचे तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवासेना उपजिलाप्रमुख राज बुचे, युवासेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर, राहुल वाकुलकर, शुभम आत्राम, रुचित सोनुने, नितेश चिड़े, संदीप चौधरी, रोशन राऊत, निखिल भजभूजे, रवि तराले, आशीष खोंड सहित अन्य युवसैनिक उपस्थित होते,