
प्रतिनिधी – कैलास राखडे
नागभीड वनविभाग मोहाळी मो. व नवखळा गावात माकडे वास्तव्य करून घरातील कवले फोडून फुले, झाडे, व फळ झाडाची नासाडी करीत आहेत, या माकडांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.मोहाळी मो, व नवखळा गावात माकडे अनेक दिवसांपासून वास्तव्य करून आहेत.
लहान मुलांच्या हातात खाऊ बघुन ही माकडे त्यांच्या हातातला खाऊ हुसकावून पडुन जातात,तर कधी मानसांवर दात कीचाऊन घरांवर उड्या मारतात,आणि ज्यांच्या घराच्या बाहेरच्या खिडक्या काचेच्या आहेत अशा घरच्या खिडक्या सुध्दा ही माकडे तोडून टाकतात,आणि गावातील पुर्ण घरावर उड्या मारुन घरावरील कवले फोडून घरांची नुकसान करीत आहेत, गावात अनेकांनी आपल्या आवारात फळ, झाडे, व फुलांची झाडे लावली आहेत, त्या फळाफुलांच्या झाडावर हीच माकडे ताव मारुन झाडांची नासाडी करीत आहेत, वनविभागाने या पिसाळलेल्या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.