राग, लोभ, अहंकार सोडून केलेले कार्य हेच खरे समाजकार्य
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :-जीवनामधे मानवाला खुप मोठा अहंकार आहे, जो व्यक्ति पैसे कमऊन मोठा झाला त्यांचे नाव इथे चालत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पैसा नाही कमविला, त्यांनी अहंकार सोडून समाधानाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, म्हणून तेच आज अमर झालेत असे मनोगत चिमूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ यानी मालेवाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त व्यक्त केले.
ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथिचा कार्यक्रम चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे संपन्न झाला या वेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, कृषि उत्तपन बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम डुकरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य राजुपाटिल झाड़े, प्रा, चरडे सर, प्रान्त सेवाधिकारी विठलराव सावरकर, सेवाधिकारी नत्थुजी भोयर, प्रा, संजय पीठाडे, केशव वरखडे, कापसे महाराज व्यासपीठावर उपस्थित होते,कार्यक्रमाचे यशस्वीते करिता गुरुदेव सेवा मंडळ मालेवाडा येथे गुरुदेव भक्तांनी अथक परिश्रम घेतले.