Breaking News

पदवीधर अशंकालीन उमेदवारांना मिळणार दिलासा 148 कंत्राटी पदे लवकरच भरणार

नागपूर, दि. 12 : जिल्हयातील विविध शासकीय आस्थापनावर रिक्त असणारी 148 कंत्राटी पदे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संवर्गातून भरावयाची आहेत. शासनाने त्यानुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित केलेली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी या विषयाचा आढावा घेवून संबंधित आस्थापना प्रमुखंना पदे भरण्याविषयी निर्देश दिले आहे.

अनेक आस्थापनांनी केवळ पदे अधिसूचित करण्याची औपचारीक कार्यवाही पूर्ण करुन आजतागायत पदभरती केलेली नाही. या सर्व विभागांना तातडीने प्रक्रीया पूर्ण करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व शासकीय आस्थापनांनी ऑनलाईन पध्दतीने पदे अधिसुचित करुन पदवीधर अंशकालीन उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती करण्याची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर.यांनी दिले आहे.

यासंदर्भात पदवीधर बेरोजगार संघटनांचे प्रतिनिधींनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. पदवीधर अंशकालीन उमेदवारांची कंत्राटी पदावर नियुक्ती करावयाची प्रक्रीया शासकीय आस्थापना पूर्ण करीत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आाणून दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दखल घेत ही प्रक्रीया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदभा्रतील अहवाल प्रत्येक विभागाने तातडीने सादर करण्याचेही स्पष्ट केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अमरावती महामार्गावर स्कार्पिओ ला थांबवून युवकांनी केली 92 हजारांची लूट

वाडी पोलिसांच्या तत्परतेने ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन …

समस्याग्रस्त चर्चेत असलेली नेरी ग्रामपंचयतीने केला स्वच्छ भारत मिशनचा फज्जा

लाखो रुपये गेले पाण्यात,शौचालय बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच नेरी शहरात पिएचसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved