
प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी (प्र)
दवलामेटी :- एस. डी. ओ. मॅडम सोबत चर्चा करुन सातबाऱ्यावर झुडपी जंगल हा शेरा काढण्या साठी काय प्रक्रिया आहे ते आधी बघू म्हणजे पट्टे वाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मार्गदर्शन आमदार समिर मेघे यांनी पट्टे वाटप करण्याचा मागणी साठी आलेल्या वंचित बहुजन आघाडी दवलामेटी शाखेचा कार्यकर्त्याना चर्चे दरम्यान सांगीतले.
४० वर्षा पासून दावलामेटी येथे राहत असलेल्या अतिक्रमणं धारकांना मालकी पट्टे मिळावे यासाठी स्थानिक नागरिकांनी, व नेते मंडळी नी अनेक दा पट्टे वाटप संबंधी मागणी चे निवेदन तहसील दार, जिल्हा अधिकारी , एस डी ओ यांना दीले आहे.
परंतू प्रशासनाचा चुकिनेच संबंधीत सातबाऱ्यावर झुडपी जंगल लीहण्यात आले आहे आणि याच चुकीचा नोंद चा आधार घेऊन शासकिय अधिकारी मालकी पट्टे वाटप करण्यास टाळा टाळ करित आहे. म्हणजेच संपूर्ण पुरावे आमच्या कडे असताना , महाराष्ट्र शासनाचा २०२२ पर्यन्त अतिक्रमणं धारकांना मालकी पट्टे वाटप करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करण्यात आल्याने मलकी पट्टे वाटप करण्यास विल्लंब होत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता अनेक शासकीय योजने पासुन वंचित आहेत अशी सविस्तर माहिती वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा सचिव अतुल शेंडे व ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम यांनी चर्चे दरम्यान आमदार समिर मेघे यांना सांगीतले.
यावर एस डी ओ मॅडम सोबत चर्चा करुन सातबाऱ्यावर झुडपी जंगल शेरा कसा कमी करता येईल हे बघू व पट्टे वाटप करण्याचा मार्ग मोकळा करू असे आश्वासन समिर मेघे यांनी यावेळ कार्यकर्त्याना केले. या वेळी वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा चे सचिव अतुल शेंडे यांचा नेतृत्त्वात शाखा अध्यक्ष दीपक कोर, ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम, संघटक रोहित राऊत , उकिंनकर काका, सोनू बोरकर व ईतर कार्यकर्ते उपस्थीत होते.