Breaking News

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 17 नोव्हेंबर : राज्याचे नगरविकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथून मुलकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता मूल येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता तालुका क्रीडा संकुल,मुल येथे मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता मुल येथून हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर कडे प्रयाण. रात्री 8 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता एन.डी. हाॅटेल, बापट नगर येथे आगमन व मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत डॉक्टर, वकील, उद्योजक यांच्यासमवेतच्या चर्चेस उपस्थिती. सकाळी 11 वाजता राजीव गांधी कामगार भवन, चंद्रपुर येथे आगमन व मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 12 वाजता जनता विद्यालय, सिव्हील लाईन येथे आगमन व मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता जनता विद्यालय, सिव्हील लाईन,चंद्रपूर येथे मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 1.40 वाजता सर्किट हाऊस, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता सर्किट हाऊस, चंद्रपूर येथून हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर चंद्रपूर कडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता हिराई गेस्टहाऊस, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव.

शनिवार, दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता हिराई गेस्ट हाऊस, ऊर्जानगर, चंद्रपूर येथून वर्धा कडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू …

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved