Breaking News

विधान परिषद निवडणूक तिसऱ्या दिवशीही अर्ज अप्राप्त

प्रतिनिधी नागपूर

नागपूर, दि. 18 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशीही अर्ज अप्राप्त आहे. आतापर्यंत इच्छूकांनी 24 अर्जाची उचल केली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून 24 नोव्हेंबरला दाखल अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. तर मतदानाचा दिवस 10 डिसेंबर असा आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved