19 व्यवसायीकावर केली कार्यवाही
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यानी रहदारीस अडथला निर्माण करणाऱ्या दुकानदारास वारंवार सूचना देऊनही चिमूर शहरारती दुकानदारानी दुर्लक्ष केल्यामुळे आज 19 अतिक्रमण धारकावर कार्यवाही करण्यात आली.चिमूर शहरातुन निघत असलेल्या चिमूर-वरोरा-चंद्रपुर हाइवे वर वाहतुकीची खुप मोठी समस्या निर्माण झाली होती, चिमूर पोलिस स्टेशनला मनोज गजभे रुजू होताच सर्व प्रथम वाहतुकीकड़े लक्ष्य केंद्रित केले, रूट मार्च च्या माध्यमातून जनजागृती केली पन दिलेल्या सूचनाकडे वाहन चालक व दुकानदार विक्रेत्यानी दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 9 दिसम्बर रोजी पोलिस स्टेशन चिमूर तर्फे चिमूर शहरात विशेष मोहिम राबऊन सार्वजनिक रस्त्यावर जीवितास धोका होईल,
अश्या प्रकारे उभे असलेल्या 9 वाहनावर कलम 283 भारतीय दंड विधान अनवये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच फुटपाथ व रोडवर विक्रेत्यानी आपले दुकान थाटून लोकांना जान्याएँयास अडथला निर्माण केला अस्या ऐकून 19 दुकानदार/विक्रेत्यावर कलम 102/117 महाराष्ट्र पोलिस कायदा अनवये कारवाही करण्यात आली, यापुढे नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कार्यवाहीचे संकेत चिमूर पोलिसांनी दिले,
पुढिल कार्यवाही पोलिस निरीक्षण मनोज गभने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, पोलिस कर्मचारी दिलीप वाढवे, नितेश गुडधे, प्रमोद गुट्टे, राहुल चांदेकर यानी केली,