Breaking News

नागपूर

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे, नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज …

Read More »

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १३ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १९ अपक्ष असे एकूण ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार …

Read More »

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आज बुधवारी आगमन झाले. उद्यापासून अधिवेशनाची सुरुवात होणार असून सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम रामगिरी निवासस्थानी होत आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री …

Read More »

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ भिषण अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व इतर प्रवासी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात …

Read More »

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन झाले. अमरावती विद्यापीठाच्या उदयाच्या पदवीदान सोहळ्यासाठी ते आले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून उद्या ते अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार …

Read More »

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२०) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व …

Read More »

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 14 लाख नागरिकांचे आधार अद्यावतीकरण बाकी असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आधार संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये निदर्शास आले आहे. …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिक्षाभूमीला भेट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन प्रतिनिधी नागपूर  नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री.शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. शहा आणि  फडणवीस यांनी यावेळी …

Read More »

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय

नागपूर, दि. २: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच सर्वाधिक १६ हजार ७०० मत मिळवून अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी रात्री ८.०० वाजता श्री. अडबाले यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. आज सायंकाळी …

Read More »

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर, दि. 16 : गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत अर्जदाराने स्वतःचा प्राधिकृत अधिका-याने दिलेला जातीचा दाखला, चालू वर्षातील प्राधिकृत अधिका-याने दिलेला …

Read More »
All Right Reserved