लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार
नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे 26 अशी कायम आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही संख्या 35 वरून 28 अशी झाली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून गौरव गायगवळी, दर्शनी धवड, नरेश बर्वे, प्रकाश कटारे, डॅा. विनोद रंगारी, सुरेश साखरे आणि संदीप गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.