Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी ( दि. २ जुलै) सकाळी १० वाजता त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानावरून निघून कोलार घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी

उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात आज दिनांक ०४/०८/२०२४ …

शेवगाव शहरातील अनेक प्रभागातील अन उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत नागरिक त्रस्त

  अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved