jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* जनतेत चर्चेचा विषय ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल का बर केला नाही? *
* अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना हरणी घाटावर गावकऱ्यांनी नऊ ट्रॅक्टर पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील हरणी नदी घाटावर अवैधरित्या रेतीची तस्करी करण्यासाठी गेलेल्या ९ ट्रॅक्टर गावकऱ्यांनी रात्र जागून पकडले आणि चिमूर पोलिसांच्या स्वाधीन केले ही घटना दिनांक.२७ मार्च २०२५ ला घडली. गावकऱ्यांनी चिमूर पोलीस विभागाला पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केलेल्या सर्व ट्रॅक्टर ला चिमूर पोलीस स्टेशन ला जप्ती करण्यासाठी नेत असतांना ९ ट्रॅक्टर पैकी ३ ट्रॅक्टर नी पोलिसांच्या ताफ्यातून पळ काढला त्यानंतर ६ ट्रॅक्टरवर चिमूर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.
उर्वरित पळून गेलेल्या ट्रॅक्टरवर कलम ३९२ दरोडा नुसार कारवाई करण्यात येईल अशाप्रकारे बातमी प्रकाशित झाली आणि जनतेमध्ये चर्चा रंगायला सुरुवात झाल्याने पळून गेलेल्या ट्रॅक्टर मालकांनी स्वतः ट्रॅक्टर चालकांच्या सहाय्याने चिमूर पोलीस स्टेशन ला लावली व जप्त केलेले ट्रॅक्टर हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्यामुळे थातूर मातुर पद्धतीने जप्त केलेल्या नऊ ही ट्रॅक्टर च्या मालकांवर कारवाई न करता फक्त चालकांवरच बी एन एस एस कलम १२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आणि पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला पत्र दिले असल्याची माहिती पोलीस स्टेशन चिमूर ईथुन प्राप्त झाली असून पुढील कारवाई महसूल विभाग करणार असे पोलीस विभागाने सांगितले.
सदर ९ ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशनमध्ये जप्त असून चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सदर चालक (१) विजय पतरु मेश्राम राहणार सावरगाव, (२) अमोल खुशाल दडमल राहणार नेरी,(३) नंदू कनिराम शेरकी राहणार वडाळा पैकू चिमूर, (४) कैलास हरिदास नन्नावरे राहणार नेरी, (५) विकल्प दिनकर नन्नावरे राहणार नेरी , (६) मंदार जगदीश ढोने राहणार नेरी, (७) रतन श्रत्री मेश्राम राहणार सावरगाव, (८) लखन संतोष श्रीरामे राहणार सोनेगाव बेगडे, (९) संदीप देवराव ननावरे राहणार नेरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.