जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :-राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी आज दिनांक 28 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय मोर्च्याचे आयोजन केले बुद्धगया येथील महाबोधिविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला गेल्या महिन्याभरापासून अखिल भारतीय भिक्षु संघ महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धगया येथे धरणे आंदोलन करत आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र आले होते धरणे आंदोलनानंतर सर्व समाज बांधवांनी आंदोलन स्थळापासून नारेबाजी करत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सन 1949 च्या बीटी ऍक्ट रद्द करून बुद्धगया ब्राह्मण लोकांच्या ताब्यातून बौद्ध अनुयायांना परत मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायी या मागणीला आपला पाठिंबा दर्शवीत आहे मात्र बिहार सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर राळेगाव तालुक्यातील भिम टायगर सेना व सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालय मार्फत राष्ट्रपती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना निवेदन पाठवले आहे यावेळी भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष अजय भाऊ शेंडे विदर्भ अध्यक्ष विनोद भाऊ फुलमाळी विदर्भ कार्याध्यक्ष सोनुभाऊ मेश्राम उपजिल्हाध्यक्ष गोपीचंद ढाले जिल्हा संघटक उमेश कांबळे तालुका अध्यक्ष प्रवीण कांबळे तालुका सचिव प्रमोद भगत कार्याध्यक्ष बबलू ताकसांडे. सहसचिव धीरज ताकसांडे कार्याध्यक्ष अजय दारुंडे व समस्त रायगाव तालुक्यातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय आहेत मागण्या सन 1949 च्या बीटी ऍक्ट त्वरित रद्द करण्यात यावा.महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्यात यावा. बुद्धगया येथे बुद्ध रूपाचे होत असलेले विद्रूपीकरण थांबवण्यात यावे महाबोधी महाविहाराचा तीन किलोमीटरचा परिसर विहाराला जोडण्यात यावा.महाबोधी महाविहाराच्या आसपास झालेले सर्व बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यात यावे.आंदोलकांनी केलेला निर्धार बुद्धगया हे बौद्ध धर्माचे अत्यंत पवित्र स्थान आहे आणि ते बौद्ध अनुयायांच्याच ताब्यात असायला हवे बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा येत्या बुद्ध पौर्णिमेला राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने बुद्धगया इथे जाऊन आंदोलनात सहभागी होतील.