jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
*बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवली. दारूबंदी विभागाची कारवाई*
अविनाश देशमुख
शेवगांव :- शेवगाव दि 21मे 2025 वार बुधवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगाव शहर व तालुक्यामध्ये बनावट दारूचा महापूर आलेला आहे. याबाबत सामान्य नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. सोशल मीडियावरही याबाबत उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेवगाव मध्ये अहमदनगर दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने याबाबत कारवाई करत शेवगाव मधील काही हॉटेलवर गेल्या शनिवारी दि १७ रोजी छापा मारून त्या हॉटेलमधून काही देशी – विदेशी दारूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असल्याबाबतची माहिती नेवासा विभागाचे दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
बनावट दारू ने शेवगाव मध्ये अनेकांची बळी घेतले आहेत. बनावट दारू मध्ये असलेल्या केमिकलने अनेकांच्या किडन्या, लिव्हर निकामी होऊन शेवगाव मध्ये अनेकांचे बळी जात आहेत. याकडे मात्र अन्न प्रशासन विभाग, दारूबंदी विभाग, अर्थपूर्णरित्या डोळे झाक करत असल्याची चर्चा सूत्रांकडून मिळते. लवकरच ह्या बनावट दारूंच्या बाटल्यांचे नमुने संकलन करून दारू उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना एक शिष्ट मंडळ भेट घेणार आहे व कारवाईची मागणी करणार आहे.
बनावट दारूचा आका पाथर्डी तालुक्यात असल्याची चर्चा !
ह्या केमिकल युक्त बनावट दारूचा आका हा पाथर्डी तालुक्यात असल्याबाबतची चर्चा आहे. हा आका काही ठराविक परमिट रूम व तालुके यांना ही केमिकल युक्त दारू पुरवत असल्याचे समजते. एवढेच नाही तर उत्पादन शुल्क विभागाला याबाबत सर्व माहिती असल्याचेही जनतेमध्ये चर्चा आहे. परंतु जनतेकडून तक्रारीची अपेक्षा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग करत आहे. लवकरच बनावट दारूच्या बाटल्या घेऊन एक शिष्ट मंडळ अजित दादा पवार यांना भेटणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
*ताजा कलम*
शेवगाव मध्ये शनिवारी उत्पादन शुल्क विभागाची झालेली कारवाई म्हणजे तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
या कारवाईतून काहीच निष्पन्न होणार नसल्याचेही बनावट दारूचे रॅकेट चालवणारे छाती ठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे शनिवारच्या या कारवाई मुळे शंका निर्माण झाली आहे. या बाबत आमच्या प्रतिनिधीने नेवासा शेवगांव चे दारूबंदीचे निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता *अ.नगर जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतरच काय कारवाई होणार हे निश्चित कळेल.संबंधित हॉटेलमधून गोळा केलेले नमुने व त्यानंतर येणारा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. ~ संजय जाधव दारू उत्पादन शुल्क निरीक्षक, नेवासा उपविभाग*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*