jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” चिमूर शहरातील घटना “
” दोन आरोपीला अटक तर एक आरोपी फरार “
” चिमूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिवसेंदिवस अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होत चालली असून आज दिनांक 20/05/2025 रोजी एका 19 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यात पोलीसांनी दोन आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगी आपल्या आजीकडे राहात होती.पायदळ आजीच्या घरी जात असतांना प्रतीक सुनील साटोने वय 26 वर्षे राहणार नेताजी वार्ड चिमूर हा मुली जवळ मोटार सायकल घेऊन आला व तुला घरी सोडून देतो असे सांगून मोटारसायकलवर बसविले व तळोदी नायक शेत शिवारात असलेल्या त्याच्या शेतातील झोपडीत नेऊन आरोपीने पिडिता सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
त्यानंतर आरोपी विकी उर्फ विक्रांत खुशाल साटोने वय 29 वर्षे राहणार नेताजी वार्ड चिमूर व त्याचा साथीदार अंकीत संजय काकडे वय 31 वर्षे राहणार टीचर कॉलनी चिमूर येथील असून हे सुद्धा घटना स्थळी येऊन संगणमत करून पिडीता सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असून कुणालाही याबाबत सांगितले तर पाहून घेऊ अशी धमकी दिल्याची तक्रार पिडीत मुलीने दिली असून चिमूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध अप.क:-205/2025,कलम 64,70(1),351 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे.
चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात गुन्हेचा पुढील तपास पीएसआय दिप्ती जयकांत मरकाम व पीसी सतिश झिलपे करीत आहे.