जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यामध्ये खुलेआम तंबाखूजन्य पध्दार्थ विकत असून अनेक वेळा कारवाही होऊन सुद्धा सुगंधित तंबाखू विक्रीचा खेळ किराणा दुकानाच्या नावाखाली सुरु असून शनिवार दिनांक ६ / ०२ / २०२० रोजी दुपारी गोपनीय माहितीच्या आधारावर मनोहर पटेल रा. टिळक वार्ड येथील रहाते घरी स्थानिक गुन्हे शाखेच्या ( LCB ) ने छापा टाकून तंबाखूजन्य , सुगंधीत पदार्थ पकडण्यात आले.
१) किंमत ३३,८००/- बाबा जर्दा तंबाखूचे एकुण १३ खरड्याच्या डोक्यातील प्रत्येकी २० ग्राम ने भरलेले प्रती नग २६०/- या प्रमाणे एकुण १३० पाकीट
२ ) किंमत १९,०००/- मजा १०८ तंबाखू चे एकुण १९ डब्बे प्रत्येकी २०० ग्राम ने भरलेले प्रती नग १,००० /-
३) किंमत १६,०००/- मजा १०८ तंबाखूचे एकुण ८० डब्बे प्रत्येकी ५० ग्राम ने भरलेले प्रती नग २००
४) किंमत २,०००/- मजा १०८ तंबाखू चे एकुण ०२ पाकीट डब्बे प्रत्येकी २०० ग्राम ने भरलेले प्रती नग १,०००/-
५) किंमत ३,०००/- इगल तंबाखू ४० ग्रामचे ५० पाकीट प्रती नग ६०
६) किंमत ३,९००/- इगल तंबाखू २०० ग्रामचे १३ पाकीट प्रती नग ३००
७) किंमत ४८,७५०/- एम. एच. रॉयल जाफरानी जर्दा कंपनीचे ६५ खोके असे प्रती नग ७५०/-
८) किंमत २२,९५० /- रजणीगंधा छोटा पाकीट ८५ खोके प्रती नग २७०/
९) किंमत ६,०००/- रजणीगंधा २० डब्बे प्रत्येकी १०० ग्राम ने भरलेले प्रती नग ३००/ असा एकुण एक लाख पंचावण हजार चारशे रुपये (१,५५,४००/- ) रुपयांचा मुद्देमाल रहाते घरातुन जप्त करण्यात आला आहे.