
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी नामे सौ पुष्पा अनंतकुमार जुनघरे वय 39 वर्ष रा. केसरीनंदन नगर , चंद्रपुर यांनी दिंनाक 29/12/2020 रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे ईशा अनंतकुमार जुनघरे वय 19 वर्ष रा. केसरीनंदन नगर, चंद्रपुर हि दिनांक 24/12/2020 रोजी दुपारी 1/30 वाजता चे दरम्याण घरी कुणालाही काही न सांगता घरून निघुन गेली तिचा शोध घेतला असता मिळुण आली नाही. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे ला. मिसींग क्र. 45/2020 अन्वये नोंद करण्यात आली.
मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर साहेब, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे दुर्गापुर यांनी विशेष पथक तयार करून सदर पथकातील पो.उप.नी. प्रविण सोनोने, पोहवा. सुनिल गौरकार , पोहवा. अशोक मंजुळकर, नापोशी. उमेश वाघमारे, पो.शी. मनोहर जाधव संतोष आडे, सुरज लाटकर, अखेर मुलीचे लोकेशन अजिंठा जिल्हा औरंगाबाद येथे असल्याची खबर मिळाल्याने दुर्गापूर पोलीसांनी तात्काळ अजिंठा गाठुन सदर हरविलेल्या मुलीस ताब्यात घेवुन तिला तिचे आई वडीलाच्या सुपूर्त केले. सदर मिसींग मधील हरवलेली मुलगी हि मागील दिड महिण्यापासुन मिसींग होती.