Breaking News

जुगार खेळणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड

सात जुगारांवर पोलीसांनी केले गुन्हे दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर / भिसी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे शंकरपूर शेतशिवारात ५२ पत्ते जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकली असता अखिल गुलाबराव मुनघाटे वय ३९ वर्षे राहणार हिरापूर तहसिल चिमूर व इतर ६ व्यक्ती जुगार खेळणारे पडून जात असतांना असे ७ व्यक्ती पकडून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.

घटनास्थळावरून ४१,५००/-रुपये आणि ईतर साहित्य ३,३६,३००/- रुपये असा एकूण ३,७७,८००/- रुपयेचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करीत जप्त करण्यात आला. भिसी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द अपराध क्रमांक २०१/२०२४ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई API बलराम झाडोकार यांच्या मार्गदर्शनात दिपक काक्रेडवार psi, मधुकर सामलवार, संतोष निभोरकर पो.हवा, किशोर वैरागडे, रजनीकांत पूठावार, नापोअ संतोष येलपुलवार,पो.आ.गोपाल आतकुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

  मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह …

१६ डिसेंबरला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी पेरू वाटप आंदोलन

ग्रामसमृद्धीचा महामार्ग खुला करा~ शरद पवळे ( महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते विशेष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved