jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
शेवगांव बस स्थानक रॅम्प चे आवारातील निकृष्ट काँक्रीटीकरणा च्या विरोधातील उपोषण
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-या बाबत सविस्तर वृत्त असे की की, गेल्या ३ ते ४ महिन्या पुर्वी शेवगांव बस स्थानकाच्या समोरच्या रॅम्प क्राँक्रीटीकरण करण्यात आलेले असुन सदरील काँक्रीटीकरणा साठी सुमारे १ कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च झालेले असुन निवडणुकीच्या काळात घाई घाईने कामे उरकण्याचा प्रयत्न झाल्याने सदरील क्राँक्रीटीकरणाच्या कामात आवश्यक त्या साहित्याची पुर्तता न करता बांधकाम करण्यात आल्याने ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
सदरील कामास सुमारे १ ते २ महिन्यापुर्वी मा.खा.श्री निलेशजी लंके साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी केली असुन सदरील कामातील भ्रष्टाचार झालेला दिसुन येत आहे. तरी सदरील कामासाठी निकृष्ट दर्जाचा सिमेंटचा वापर केला असुन यामुळे वृद्ध, शाळकरी मुले यांच्यासह बस स्थानका बाहेरील व्यवसायीक बंधु, सेवेत असलेले सर्व कर्मचारी प्रवासी आणि परिसरातील व्यापारी या धुळीच्या त्रासाला कंटाळले काहींना श्वसनाचा आलर्जीचा सर्दी, कायमचा खोकला सायनस डोके दुखी, फुफ्फुसाचा गंभीर आजार असा त्रास होवुन धुळीचा व सिमेंटच्या फुफाट्यामुळे गंभीर शारिरीक व्याधी होत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने शेवगांव च्या बस स्थाकात चोवीस तासात ४०० च्या वर फेऱ्या होत आहे. यात सुमारे १० हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात. यापुर्वीही डेपो म्यानेजर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.
परंतु कोणतीही दखल घेतली नाही. सध्याच्या परिस्थितीत पैठण,मढी आदी ठिकाण च्या यात्रेचा काळ व लग्न सराईचा काळ असल्याने प्रवाश्याना हाल सहन करावे लागत आहेत वरील सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्ते सुनिल रामचंद्र रासने, कॉ. संजय भगवान नांगरे, श्री दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे व इतर नागरीक,दि.०१/०४/२०२५ वार मंगळवार रोजी सकाळी १० वा. बस स्थानकाच्या आवारात आमरण उपोषणास बसणार आहोत. निवेदनाच्या प्रती पालक मंत्री साहेब, अहिल्यानगर खासदार निलेश लंके नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ आ. मोनिकाताई राजळे, विधानसभा मतदार संघ, शेवगांव पाथर्डी विभाग नियंत्रक साहेब, रा.प. महामंडळ, अहिल्यानगर आगार व्यवस्थापक साहेब, रा.प. महामंडळ,शेवगांव उपकार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी. अहिल्यानगर तहसिलदार शेवगांव,पोलीस निरीक्षक शेवगाव यांना देण्यात आल्या आहेत
*ताजा कलाम*
*बसस्थाकाच्या ढिसाळ कारभाराच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत भर उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नाही बसस्थानक सुरु होऊन सहा महिने झाले तरी उपहार गृह नाही महिलांना शौचालाय मोफत असताना त्यांच्याकडून ठेकेदार शुल्क आकारात असतात स्वीपर म्हणुन खासगी व्यक्ती नेमलेल्या आहेत त्या फक्त साहेबांच्या मागे पुढे करताना दिसत असतात बाहेरून येणाऱ्या गाड्या कुठल्याही फलाटावर लागतात याला जबाबदार कोण ??? प्रवाशी गाड्यांची चौकशी करायला गेल्यावर वाहतुक नियंत्रक उद्धट भाषा वापरतात तुला एवढी घाई आहे तर प्रायव्हेट गाडी करून का जात नाही असं बोलतात आणखी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमद्ये विसंवाद जातीयवंडाला खतपाणी घातले जाते ड्युटीच्या बाबतीत काही वाहक चालक तुपाशी तर काही उपाशी असा प्रकार सुरु आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*