jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
चिमूर येथील नेरी मार्गावरील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- एक प्रेमीयुगुल एकमेकांची मस्करी करीत असतानाच प्रियकराने प्रेयसीची ओढणी गळ्याला गुंडाळून झाडाला आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला आणि ही मस्करी जीवघेणी ठरली. ओढणी गळ्याभोवती आवळली गेली व प्रेयसीच्या डोळ्यादेखत प्रियकराला गळफास लागून मृत्यू झाला.ही हृदयद्रावक घटना मंगळवारी साय ६:३० वाजताच्या सुमारास चिमूर नेरी रोडवरील भूमी इम्पायर लेआउट मध्ये घडली. प्रितम ठाकडे (२१) रा. पेंडकेपार, ता. उमरेड, जिल्हा, नागपूर असे मृताचे नाव आहे. चिमूरपासून अठरा किलीमीटर अंतरावरील एका गावात राहणारी युवती चिमूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.मंगळवारी परीक्षा देण्यासाठी ती चिमुरातील राष्ट्रसंत महाविद्यालय येथे आली होती. सोबत तिचा प्रियकर असलेला मामेभाऊसुद्धा आला होता. पेपर देण्यापूर्वी दोघांनी मिळून एका हॉटेलात नाश्ता केला.
ती पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. सायंकाळी पेपर झाल्यानंतर पुन्हा दोघेही भेटले. यानंतर एकांत मिळावा म्हणून नेरी रोडवरील भूमी इम्पायर लेआऊटमध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला, गमतीगमतीत प्रितमने लिंबाच्या झाडाला ओढणीने गळफास लावला. फास गळ्याभोवती आवळला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने प्रितमला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे प्रयत्न निष्फळ ठरले तिनेच घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी चिमूर पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संतोष बाकल, सहायक पोलीस निरीक्षक निशांत फूलेकर, विलास निमगडे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करीत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.