Breaking News

प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. ही बातमी 4 एप्रिल रोजी सकाळी आली. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. “मेरे देश की धरती सोने उगल” आणि “भारत की बात सुनाता हूँ” सारख्या गाण्यांनी देशातील प्रत्येकजण त्यांना ओळखतो. पुरब और पश्चिम, क्रांती, रोटी कपडा और मकान ही त्यांची फारच गाजलेली चित्रपट आहेत. त्यांनी बराच काळ रसिकांच्या मनावर राज्य केले होते.

मनोज कुमार यांना भारतकुमार हे मिळाले नाव मनोज कुमार हे देशभक्तीपर भुमिकांसाठी मोठे प्रसिद्ध होते. त्यांच्या देशभक्तीपर भूमिकांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या चित्रपटातील देशभक्तीपर गीत आजही राष्ट्रीय उत्सवावेळी गायली जातात. त्यांच्या भुमिकेंमुळे देशात तेव्हाच्या काळी जनतेत राष्ट्रप्रेमाचे जाज्वल्य निर्माण झाले होते आणि यामुळेच त्यांना ‘भारत कुमार’ ही पदवी क्रीडा रसिकांनी दिली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप

मनोज कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप सोडली. हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे मुळ नाव आहे. त्यांनी उपकार (1967), पूरब और पश्चिम (1970), आणि क्रांती (1981) यांसारख्या कालातीत क्लासिक्ससह रुपेरी पडद्यावर देशभक्तीची पुन्हा व्याख्या केली.

पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार

मनोज कुमार यांच्या चित्रपटात भारताबद्दलचे आटोकाट प्रेम, राष्ट्रभक्ती, संस्कृतीचा मिलाफ होता. त्यांनी कसदार अभिनयातून देशाचे चित्र जगासमोर नेले, त्यांच्या चित्रपटातून जागतिक पटलावर भारताला ओळख मिळाली. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक दशकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या कलेचा सन्मान होता.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

डी.जे. साहित्य चोरी करणारे ५ आरोपी अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” चोरीस गेलेला १,५०,०००/- रु. ची मालमत्ता जप्त …

वाघाने गोठ्यातील चार जनावरे केली ठार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   मासळ परीसरातील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved