jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
राळेगाव तालुक्यातील वरणा येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी -शशिम कांबळे
राळेगाव :- शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसे दिवस वाढत आहे याला शासनाचे शेतकऱ्या प्रति असलेली अनास्था त्यांच्या शेतमालाला योग्य न मिळत असलेला बाजारभाव वाढते बियाणे खताच्या किमती शेती साठी लागणारी मजूरी मा सर्वामुळे शेतकरी हवाल दिल झाला असून तो आत्मघातकी निर्णय घ्यायला लागला आहे . असाच निर्णय वर्णा येथील शेतकरी वासुदेव नथ्युजी आत्राम ( ४५) यांनी घेतल्या चे दिसून आले वासुदेव आत्राम आपल्या घरी कुटुंबा सोबत अंगणात झोपला असता रात्री दोन वाजताच्या दरम्यान घरामध्ये जावून वर लोखंडी पाईपला दोर बांधून स्वताला संपवल घरच्यांना हा प्रकार माहीती नव्हता पत्नी शुभांगी (३८) हि रात्री उठून घरात गेली असता तिला हाताला काही तरी लागल्याचा भास झाला कारण तिला डोळ्यांनी काही दिसत नाही ती भितीने ओरडली मुलगा उठला त्यांने लटकलेल्या अवस्थेत वडीलाला पाहीले तेव्हा पहाटेची ४ वाजले होते आरडा ओरड झाली घरा मागे असलेल्या मोठया भावाच्या घरचे सर्वच काय झाल म्हणून धावत आले.
वासुदेवने केलेला प्रकार समोर पाहून प्रत्येकांनी हंबरडा फोडला. वासुदेव आत्राम यांच्या कडे ३ एकर कोरडवाहू शेती आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पन्नास हजार कर्ज आहे.खाजगीतील दोन चार लाख शेती साठी घेतलेले कर्ज असल्याचे कुटूंबाने सांगितले वासुदेव आत्राम यांच्या मागे पन्ती शुभांगी (३८) मुलगी कु राखी (१७) मुलगा करण (१५) आहे मुलगी १२वी ला मुलगा १० वी ची परीक्षा दिली. घटनेची माहिती राळेगांव पोलिसांना दिली पोलीस जाधव महसुलचे मोतीलाल आडे वर्णा येथील माजी सरपंच कुंडलीक कुमरे विठ्ठल किन्नाके यांनी घटना स्थळी उपस्थीती लावली आज दुपारी 2वाजता शवविच्छेदन करून वर्णा येथील स्मशान भूमित अतिंम संस्कार करण्यात आले यावेळेस ग्रामस्थ उपस्थित होते . नापीकी मुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थ सांगत होते.पुढील तपास राळेगाव पोलीस करत आहे