jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
पोलीस दादा ना हे दिसत तरी कसे नाही?
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही रेती घाट लिलाव झालेले नसून याचा फायदा रेती, मुरुम,कलई माफिया घेत असून प्रशासकीय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक याकडे पाठ फिरवीत दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे.रेती चोरीच्या घटनेत सामान्य माणूस,मजुर तसेच ट्रॅक्टर चालकाने नेहमीच अपघातात जिव गमविला आहे. मात्र एक दोन दिवसच ट्रॅक्टर वाले अवैध धंदे बंद ठेवतात आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी अवैध धंदे जोमाने सुरू करतात. रेती माफियांनी तर चक्क नव युवकांना रोजगार देत दारूचे व्यसन लावून त्यांना दारूचे आहारी नेत रात्रीच्या अंधारात रेती चोरीच्या कामाला लावलेले आहे.
हाताला काम नसलेले बेरोजगार तरुणांची युवा पिढी वाया चालली आहे.पैसा कमविण्याच्या नादात काही जण ट्रॅक्टरवर मजुरी करतात तर काही जण लायसन्स नसतांना सुद्धा ट्रॅक्टर चालवितात यास जबाबदार तरी कोण?. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.फक्त यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यामुळे यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढतच चालली असून अशा अवैध व्यवसायास शासनच कुठेतरी चालना देत असल्याचे चित्र उघळ सत्य आहे.