- एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन.
- आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा.
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करीत असताना मागील राज्य शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजुरी देत पद भर्तीस मंजुरी दिली आणि अप्पर जिल्हाधिकारी सुके यांची पण नियुक्ती करण्यात आल्यावर सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले नाही परंतु शासनाने तलाठी मंडळ अधिकारी स्तरावर सुद्धा आक्षेप मागविले त्यामुळे चिमूरकरात भीती चा सूर निघत असल्याने चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या वतीने बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसडीओ मार्फत निवेदन देऊन चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी करीत आगामी चिमूर नप निवडणूक वर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आले.
दरम्यान चिमूर क्रांती जिल्हा समितीची हुतात्मा स्मारक मधील बैठक धनराज मुंगले यांच्या अध्यक्षते खाली झाली यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, सचिव सुनील मैंद, जीप सदस्य सतीश वारजुरकर जीप सदस्य गजानन बुटके गजानन अगडे , प्रकाश बोकारे, कृष्णा तपासे ,प्रा संजय पिठाडे, हेमंत जांभूळे अरुण लोहकरे हरीश पिसे बाळकृष्ण बोभाटे मोतीराम लाखे अब्दुल कदिर शेख सुनील दाभेकर आदी उपस्थित होते .