Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी प्रस्ताव पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी. याचबरोबर ज्या विभाग प्रमुखांनी नियतव्यय प्रमाणे यापूर्वी कामे पूर्ण केली नाहीत त्यांचा निधी अन्य अत्यावश्यक कामांना वर्ग करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शासन निर्णयान्वय गठीत …

Read More »

अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

अमरावती, दि. 04  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला.   उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना …

Read More »

गडचिरोली- चिमुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी

गडचिरोली,दि.4: 12 – गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात …

Read More »

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे.शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …

Read More »

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …

Read More »

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे, नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज …

Read More »

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १३ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १९ अपक्ष असे एकूण ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार …

Read More »

४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे रविवारी ही लसीकरण सुरु राहणार

नागपूर, ता. 7 : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये कोव्हिशिल्ड दिला जाईल. शासकीय व मनपाच्या 96 …

Read More »

लॉकडाऊन काळात फक्त ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करा. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर दि.5 मे : जिल्हयात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता नागरिकांनी ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले . शासनाने आंतरजिल्हा व शहराबाहेर प्रवास करण्यासाठी निकडीच्या ,आवश्यक सेवा असलेल्या प्रवाशासाठी वाहनक्षमतेच्या 50 टक्के प्रवास करू शकण्याचे आदेश काढले आहेत. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून या …

Read More »

४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे गुरुवारी लसीकरण सुरळीत होणार

नागपूर, ता. ५ : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे ३ केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदीरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व …

Read More »
All Right Reserved